नवी मुंबई | तळोजा एमआयडीसी येथील सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (इपीटी) नसणाऱ्या कंपन्या बंद करण्यात याव्यात तसेच घरगुती सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (एसटीपी) तात्काळ बसविण्यात यावी, असे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तळोजा एमआयडीसीसंदर्भात आढावा बैठक पर्यावरणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडली त्यावेळी ते बोलत होते.