ज्योतिष्यात नऊ ग्रह सांगण्यात आले आहे. आणि सर्व ग्रहांची वेगवेगळी धातू आहेत. ग्रहांचा राजा सूर्य आहे आणि सूर्याची धातू तांबा. हिंदू धर्मात सोनं, चांदी आणि तांबा ह्या तीन धातूंना पवित्र मानण्यात आले आहे. म्हणून पुजा पाठात या तीन्ही धातूचा सर्वात जास्त वापर करतात. त्याच बरोबर या धातूच्या अंगठ्या सुद्धा लोक आपल्या हातात धारण करतात. तसेच तांब्याची अंगठी हातात घालण्याचे अनेक फायदे आहेत.
१) तांब्याची अंगठी हातात घातल्याने तांब्याचा शरीराच्या सतत संपर्कात राहते. आणि यामुळे तांब्याचे गुण शरीराला मिळत जाते. याने रक्त शुद्ध होते.
२) ज्या प्रकारे तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आसत. तसेच तांब्याच्या अंगठीमुळे देखील फायदा होतो.
३) तांब्याच्या अंगठीच्या प्रभावामुळे पोटाचे रोग दूर होतात.
४) तांबा सतत त्वचेच्या संपर्कात राहतो. त्यामुळे त्वचेची चमक वाढते.
५) तांब्याची अंगठी हातात घातल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
६) त्याशिवाय अंगठी धारण केल्याने शरीरावरील सूज कमी होते.