उन्हाळा आला की तापमान वाढतेच वाढते. यंदाचा उन्हाळा मात्र भयंकर तापणार असल्याची माहिती वर्ल्ड मेटोराॅजिकल संस्थेने दिली आहे. आतापर्यंतच्या १४० वर्षाचा आढावा घेवून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, जगातील सर्वच खंडात तापमानाची झळ बसताना दिसत आहे. समुद्रात झालेले तापमानाची वाढ. हिमगंगेचे वितळणे याचा सर्व फटका तापमान वाढीमुळे बसत आहे. केरळमध्ये आलेल्या महापूर याचाच एक परिणाम होता असे दिलेल्या माहितीनुसार समजते.