साखरेची मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल राहण्यासाठी साखर कारखाने आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी समन्वय साधून नो लिन खाते उघडावे. हे खाते काढत असताना केंद्र शासनाचे आणि साखर आयुक्त यांचे संमतीपत्र बँकांना द्यावे.
दरम्यान, साखर कारखान्यांना साखर निर्यातीस प्रोत्साहन आणि मदत देण्यास शासन सहकार्य करेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानभवनात साखर कारखान्यांच्या विविध समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.