राज्यातील शासकीय कर्मचा-यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. येत्या नववर्षापासून अर्थात १ जानेवारीपासून सातवा वेतन लागू होणार आहे. यामुळे राज्यातील १७ लाख कर्मचारी आणि ६ लाख निवृत्त कर्मचा-यांना याचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, आयोग लागू झाल्यानंतर कर्मचा-यांचे अनेक आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. हा आयोग लागू झाल्यानंतर कर्मचा-यांना २० हजारांपेक्षा वेतन मिळेल अशी माहिती अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.