आवळा एक फळ आहे आणि औषधही आहे. आयुर्वेदामध्ये आवळ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात आवळा रसपूर्ण होतो. व त्यात शक्तीवर्धन रसायने समाविष्ट होतात. आवळा हे फळ आपण वर्षभर खावू शकतो. तसेच आवळ्याचा वापर आपण औषध म्हणूनही करू शकतो.आवळ्याचे सेवन आपण वेगवेगळ्या पध्दतीने करू शकतो. आवळ्याचे लोणचे,मुरब्बा, ज्यूस, सुपारी, चूर्ण हे सर्व प्रकार तयार करून वर्षभर खावू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळया आजारांवर औषधही करून आपण आवळ्याचा वापर करू शकतो.
आवळा या फळांत जितके ‘सी’ व्हिटॅमिन आढळते तितके अन्य कोणत्याही फळात आढळत नाही. सर्वात जास्त व्हिटॅमिन ‘सी’ आवळ्यामध्ये आढळून येते.
आवळा हे तूरट-आंबट असल्याने पित्त,कफ व जुलाब या आजारावर उत्तम औषध आहे.
आवळाचे सेवन केल्याने चेहरा तेजस्वी बनविण्यासाठी मदत होते.
स्नायू तसेच दात मजबूत ठेवतो.
रक्तशोध, नजर तेज करणारा, केसांना काळेशार करणारा , हदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला अशा अनेक आजारांनवर गुणकारी फायदा होतो.