पोहरादेवी | जगद्गुरु संत सेवालाल हे केवळ संत नव्हते ते एक शूर योद्धा पण होते ज्यांनी महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देशात स्वाभिमानाने जगा लाचार होऊ नका अशी शिकवण दिली. माझ्या आजोबांनीही संत सेवालाल यांच्या विचारांचा अवलंब केला. पोहरादेवी येथे झालेल्या नगारा भूमिपूजनच्या प्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असे प्रतिपादन केले.
दरम्यान, जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या नगारा वास्तूसंग्रहालयाच्या भूमिपूजनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.