थंडीमध्ये वातावरणातील गारवा आणि शुष्क हवा यांमध्ये स्किनची आणि केसांची समस्या उद्भवते. ज्याची स्किन आॅयली असते त्यांना थोडा आराम मिळतो. परंतु ज्याची स्किन ड्राय असते त्यांना त्वचेची अनेक समस्यांचा त्रास होतो. थंडीमध्ये कोणतीही क्रिम किंवा माॅयश्चरायझर वापरलं तरीही त्यांची स्किन कोरडी होत जाते. माहागातल्या माहाग क्रिम वापरूनही या समस्या पासून सुटका होत नाही. म्हणूनच हिवाळ्यात स्किनची योग्य पध्दतीने काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री पर्यंत योग्य काळजी घेणे गरजेचे असते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेवू शकता.
१) ड्राय स्किनसाठी सनस्क्रिनचा वापर करणे फायद्याचे ठरते.
२) मेकअप करण्याचा विचार करत असाल तर चेहऱ्यावर लाइट मेकअपचा वापर करा. आणि तुम्ही कमी केमिकल असणाऱ्या बीबी क्रिमचा वापर करू शकता.
३) हिवाळ्यात सर्वात आधी सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. दिवसातून २/३ वेळा चेहऱ्या पाण्याने धुवा. असं केल्याने चेहरा फ्रेश दिसेल.
४) चेहरा स्वच्छ केल्यानंतर स्किनवर क्रिम किंवा माॅयश्चरायझर लावा.
५) टोनरचा वापर करा. टोनर लावल्यानंतर ५ मिनिट तसेच ठेवा.