जळगाव | दिवसेंदिवस कमी होणारा पाऊस, वाढते ऊष्णतामान वाढते तापमान, वायुप्रदूषण, वाढती कारखानदारी अमाप वाढणारी स्वयंचलित वाहनांची संख्या कारणामुळे हवेतील ओक्सिजनचे प्रमाण तसेच झपाट्याने कमी होणारा ओजोनवायुचा स्थर हे सगळेच घातक असून भविष्यातील ढोल लक्षात घेऊन लाखो नव्हे तर कोट्यवधी वृक्ष लगवडीची मोहीम होती घेतली आहे. परंतु ही मोहीम राबवताना कमालीची उदासिनता व भ्रष्टाचार होत असून कोट्यवधीं चे उदिष्ट असतानाच हजारावार सुध्दा वृक्ष लावले गेले नसून फक्त आणि फक्त जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
तरी चौकशी होऊन कारवाई व्हावी व वृक्षलागवड मोहीम प्रत्यक्षात आमलात आणावी अशी मागणी निसर्ग प्रेमींनी केली आहे.