कोल्हापूर | मराठी चित्रपट सृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणा-या ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे आज पहाटे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. ते ६१ वर्षाचे होते. जुने आणि नवे चित्रपट जोडण्याचा काम त्यांच्या कारकीर्दत झाले.
हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने भालकरांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘पैज लग्नाची’, ‘राजमाता जिजाऊ’ हे त्यांचे चित्रपट गाजले होते. ‘पैज लग्नाची’ या चित्रपटासाठी त्यांना १४ पुरस्कारही जाहीर करण्यात आले होते.