पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त असतो. याचे कारण त्याचे दुहेरी जीवन सुध्दा असू शकते. त्यावेतिरिक्त काही हार्मोनल कारणे देखिल जबाबदार असू शकतात. परंतु डोकेदुखी शरीराबद्दल बरेच काही सांगते. बऱ्याच वेळा डोकेदुखी फक्त डोकं दुखण्यामुळेच होत नाही तर यामागे इतर दुसरेही कारण असू शकते. जसेकि शरिराच्या इतर भागात वेदना किंवा कोणताही रोग. हे ही कारण असू शकतात डोकेदुखीचे.
१) जास्तवेळ विचार करण्यामुळे
जेव्हा आपला मेंदु अनेक गोष्टींचा विचार किंवा ओझं सहन करतो, तेव्हा त्यांना वेदना होतात. आपण बऱ्याच वेळा काही गोष्टीत अडकलेलो असतो. किंवा काही वेळा आपण एकाच गोष्टीचा विचार करत बसलो कि ही समस्या उद्भवते.
२) हार्मोन
डोकेदुखीमागील एक मुख्य कारण म्हणजे हार्मोन देखिल असू शकते. हार्मोनमुळे हदयाचे ठोके सुध्दा वाढू शकतात. जास्त प्रमाणात घाम येतो. यामुळे देखिल डोकेदुखीचा त्रास होऊ शकते.
३) तणाव
प्रत्यक्षात डोके दुखणे कोणत्या भागात आहे हे आपली मन:स्थिती ठरवू शकते. तणावामुळे डोक्याचे दोन्ही भाग दुखते.
४) ब्रेन
जर तुमच्या मेंदुच्या भागात वेदना होत असेल तर, हे सामान्य दुखने नाही. हि वेदना माइग्रेनची असू शकते. मेंदुतील वेदना बऱ्याचदा डोक्याच्या मध्यभागी अनुभवली जाते. हे दुखने धोकादायक असू शकते.
५) पचन तंत्र
बऱ्याच वेळा डोकेदुखी डोक्याशी संबंधित नसून पोटाशी संबंधित असते.पचन तंत्र योग्य नसल्यामुळे देखिल डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.