नेहमी फळांचा ज्यूस प्यायलाने शरिरासाठी चांगले असते. दररोज फळं किंवा ज्यूस प्यायल्याने शरिरातील रक्त वाढते. रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्याशिवाय आपली पचनशक्तीही सुधारते. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेली काही फळं पाहूया तसेच पोटाच्या आजारांपासून दूर राहू शकता. आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करते.
1) जर तुम्हाला वजन कमी करण्याच असेल तर संत्र्याचा ज्यूस प्या. संत्र्याच्या ज्यूसामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात.जर तुम्ही रोज संत्रे खाल्ले तर एका वर्षात १९ हजार कॅलरी वाचवू शकता.
२) द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सी सोबत फायबरही असते. द्राक्षही वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
३) दररोज नाश्ताच्या एवजी जर सफरचंद खाल्ले तर तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये कॅलरीज कमी असते पण फायबर आणि व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असते.
४) नारळामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन ए,बी,सी, आणि खनिज जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे वजन वाढलेल्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरते.
५) अननसामध्ये सर्व उपयुक्त व्हिटॅमिन आणि पोषक तत्व असतात. अननसामध्ये ८५ टक्के पाणी असते.