पितृ दोषाने पीडित व्यक्तीचे जीवन अत्यंत कष्टाचं असतं. म्हणून ज्या मनुष्यांना पितृदोष अनुभव होत असेल किंवा घरात सतत काही त्रास होत असेल तर त्यानी दररोज दत्तात्रेय नावाचा जप करावा. तसे तर दत्ताच्या नावाचे स्मरण सतत करत राहावे. परंतु विशेष करून अमावस्या आणि पौर्णिमेला तर दत्ताच्या नावाची माळ अवश्य जपावी.
दत्त पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीला दत्तात्रेयाचे दोन शक्तिशाली महामंत्र ‘श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ आणि दुसरा म्हणजे ‘श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राने माळ जपल्याने पितृदोष दुर होवून सर्व समस्या दूर होतात. आणि नविन मार्ग सापडतात.