श्रेय तंत्रज्ञान आणि उद्योजकता कौशल्य विकास, कोपरखैरणे,कार्पोरेट व्यवहार मंत्रालय भारत सरकार द्वारे मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने ४ ते ६ जानेवारी २०१९ या कालावधीत कोपरखैरणे
येथे ३ दिवसीय सौर उर्जेवर आधारित व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणाऱ्या या
कार्यक्रमामध्ये प्रभावी सौर उर्जेचा वापर, दैनंदिन जीवनातील त्याचा उपयोग,सिस्टिम इन्स्टॉलेशन, देखभाल/दुरुस्तीचे प्रशिक्षण,कॉस्टिंग calculation,ग्रिड/नेट मीटरिंग फायदे,सौर ऊर्जा विषयी प्रात्यक्षिके,राज्य व केंद्र शासकीय आर्थिक संबंधित योजना, व उद्योजकता विषयीचे मार्गदर्शन केली जाणार आहे. ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी
इच्छुक उमेदवार किमान १०वी पास पाहिजे.पदवी,पदविका, आय टी आय धारकांना विशेष प्राधान्य देण्यात येणार असून तरी इच्छुकांनी ९४०३०७८७८०,९०२९८१०५१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचेआवाहन करण्यात आले आहे.ऑनलाईन नोदणीसाठी व माहिती करता इच्छुकांनी website:http://training.shreay.in या संकेत स्थळावर भेट द्यावी.