मुंबई ही आपणा सर्वांसाठी च एक मायानगरी आहे . “Mumbai चलते हैं Life बन जाएगी”. मुंबईत कुणीही उपाशी राहत नाही हेही सर्वश्रुत आहे. या व अशा अनेक गोष्टींमुळे आज जो तो मुंबईकडे धावू पाहतोय , आपलं बस्तान वसवू पाहतोय. त्यामुळे मुंबईत लोंढेच्या लोंढे दररोज येऊन धडकतायेत. झोपडपट्टीत भाड्यानं राहतात अथवा जमलंच तर नवीन झोपडी बांधतात. तेवढही जमलं नाही तर फूटपाथ वर आपलं झोपडं बांधून राहतात. काही काम धंदा न करताच आनंदाने जगतात.
दिलदार मुंबईकर असताना पैशाची काय चिंता यांना. सिग्नल वर नाहीतर रेल्वे स्टेशन नाहीतर एखाद्या मंदिराबाहेर बसायचं चिमुरड्या जीवाला घेऊन काही तास आणि त्या दिवसाची सोय झाली की बस.
खायचं , प्यायचं , मुलांना जन्माला घालायचं ( भीक मागायला) ,ररस्ते , फूटपाथ घाण करायचे कि संपलं ह्यांचं काम.
जेव्हापासून अनधिकृत झोपड्या ह्या अधिकृत व्हायला लागल्या न, तेव्हापासून हा लोंढा मुंबईकडे जास्तच वाढू लागला . झोपड्या बांधण्याचं प्रमाण ही खूप वाढत गेल. त्यात SRA मध्ये घर मिळू लागली आणि ह्या लोकांना अजूनच चेव चढला झोपडी बांधायचा. इथे सामान्य माणूस 1BHK साठी आयुष्यभर बँकेच लोन फेडत बसतो अन हि लोकं फुकटची जागा बळकावून झोपडी काय बांधतात आणि बिल्डिंग मध्ये राहायला सुद्धा जातात. यातली काही SRA त मिळालेला फ्लॅट RENT वर देऊन पुन्हा नवीन झोपडीत राहायला जातात. सामान्य नागरिक मात्र 1BHK साठी आयुष्यभर पायपीट करतो मेहनत करतो. बरं यांना कसलीच चिंता ,जबाबदारी नसते बरं का. ना विजेच्या बिलाची चिंता ना साफसफाई ची . वीज एकतर आकडा घेऊन घेतलेली किंवा रस्त्यावरचे दिवे आहेतच की. उरला प्रश्न सफसफाईचा तर BMC ने नेमलेला कर्मचारी नियमित येऊन साफसफाई करून जातो. ह्यांच्या घरचाच नोकर खास BMC ने नेमलेला.
आज गावोगाव हागणदारी मुक्त झालेली पाहतो अन आपल्या मुंबापुरीच काय? कधी होणार ही स्वछ सुंदर मुंबई?
हीच फूटपाथ वरची घाणेरडी वस्ती आज जागोजागी बाहेर रस्त्यावर सौचास बसताना आपण पाहतो. तिथला परिसर हवा त्याने दूषित होऊन विविध आजारांना आमंत्रण देते. ह्या गलिच्छ वस्त्यांमुळे आज मुंबईची दैना झाली आहे , घाणेरडी झाली आहे आपली मुंबापुरी, अपनी सप्नो कि मुंबई.
त्या विभागातील नगरसेवकांना नसतील का दिसत ह्या वस्त्या ज्या सगळीकडे अस्वछता पसरवतात? का सहन करायचं सामान्य नागरिकाने ? जो आपलं टॅक्स वेळो वेळी भरतो, शहरात स्वछता राखतो, जो कर्तव्य दक्ष आहे. त्याने कुणाकडे मागावी दाद?
– तृप्ती पिंपळे