मुंबई | वर्ष २०१८-१९ साठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. मंदार भानुशे (मुंबई) यांची तर प्रदेश मंत्री म्हणून अनिकेत ओव्हाळ (मुंबई) यांची पुनर्निवड करण्यात आली. हि निवड निर्वाचन अधिकारी प्रा.डॉ.वरदराज बापट यांनी मुंबई येथे केली. प्रा.मंदार लक्ष्मीकांत भानुशे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत गणित या विषयाचे अध्यापन करतात. वसई येथे निवास आहे. गेली १३ वर्षे अध्यापन कार्य करत असून, २०१३ मध्ये त्यांना गणिताच्या ऑनलाईन लेक्चर्ससाठी ‘Indian Education Award’ ने सन्मानित करण्यात आले आहे. ६ अंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये त्यांनी पेपर सदर केले असून ४ पुस्तकांचे लेखन केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ४ वर्ष रा.स्व.संघाचे प्रचारक म्हणून कार्य केले आहे. प्रा.भानुशे सर १९९८ पासून अभाविप च्या संपर्कात असून यापूर्वी मुंबई महानगर उपाध्यक्ष व मुंबई महानगर अध्यक्ष अश्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या .त्यांची वर्ष २०१८-१९ साठी अभाविप कोंकण प्रदेश अध्यक्ष म्हणून पूनर्निवड करण्यात आली आहे.
अनिकेत गौतम ओव्हाळ. मुळचे चेंबूर चे कार्यकर्ते आहेत. मुंबई येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी M.Sc (IT) चे शिक्षण घेतले आहे. २०११ पासून अभाविपच्या कार्यात सक्रीय आहेत. यापूर्वी त्यांनी पूर्व मुंबई भाग मंत्री, मुंबई महानगर सहमंत्री, मुंबई महानगर मंत्री, कोंकण प्रदेश सहमंत्री व प्रदेश विद्यापीठ संयोजक अश्या विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मुंबई मंत्री असतांना विविध महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रीये मधील भ्रष्टाचार, शिष्यवृत्तीतील गोंधळ या विरोधात यशस्वी आंदोलन केले तसेच शहरी माओवादाच्या विरोधात महाविद्यालयांमध्ये जनजागृती त्यांनी केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभार विरोधात २०१६ ला निघालेल्या छात्र हुंकार मोर्च्याचे यशस्वी नेतृत्व त्यांनी केले आहे. भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयातर्फे जपान सरकारच्या “Ship for World Youth Leaders – 2017” च्या माध्यमातून ५ देश्यांचा अभ्यास दौऱ्यासाठी त्यांनी भारतीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच भोपाल येथे झालेल्या South-Asean देश्यांच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांची वर्ष २०१८-१९ साठी अभाविपचे प्रदेश मंत्री म्हणून पूनर्निवड करण्यात आली आहे.दि. २७ डिसेंबर २०१८रोजी कर्णावती (गुजरात ) येथे होणाऱ्या ५३ व्या कोंकण प्रदेश अधिवेशनात नवनिर्वाचित अध्यक्ष व मंत्री आपला पदभार स्वीकारतील.