केळी अशा प्रकारचा फळ आहे की कुठल्याही हंगामात उपलब्ध असते. आणि ते कुठल्याही वेळी खाण्यासारखे असते. केळी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आणि म्हणूनच क्रीडा क्षेत्रातील लोकं जास्त प्रमाणात केळी खातात. केळी सहजपणे सर्वत्र उपलब्ध असते आणि अल्प दरात मिळते.
केळी आपल्या आरोग्यासाठी इतकी उपयुक्त आहे की दररोज दोन केळी खाल्याने आपले आरोग्य सदृढ होऊ शकते याशिवाय केळी खाल्याने आपलं रक्तदाब आणि पचनक्रिया सुरळीत राहते. केळीचा वापर करणे म्हणजे शरीरातील उर्जेचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. केळीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण केव्हाही, कधीही खाऊ शकतो. म्हणून दररोज सकाळी दोन केळी खा आणि आरोग्य मिळवा.