आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा असतो. तो पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक बनवण्यासाठी एक महत्त्वाचा योगा म्हणजे पादहस्तासन केल्याने कंबर लवचिक बनते.आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा असतो तो पाठीचा कणा. हा पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक बनवण्यासाठी एक आसन आज तुम्हाला सुचवतोय, ज्याचं नाव आहे पादहस्तासन. जांघा, पोटऱ्यांच्या स्नायूंना हे आसन बळकटी देतं. या आसनामुळे बद्धकोष्ठता, गॅस, लठ्ठपणा, मधुमेह, भूक न लागणं हे पोटाशी संबंधित विकार दूर होण्यास मदत होते. हे आसन केल्यानं फुफ्फुसं, हृदय आणि मेंदूच्या दिशेनं रक्तपुरवठा वाढतो. यामुळे हे अवयव अधिक कार्यक्षम होतात. मुलांची उंची वाढवण्यात हे आसन उपयुक्त ठरतं. सुषुम्ना नाडीवर ताण येत असल्यानं ती मजबूत होते आणि पूर्ण शरीरामध्ये ऊर्जेचं संतुलन कायम राहतं.
सरळ उभं राहून दोन्ही पाय एकमेकांना जोडा. श्वास भरुन हात वर उचलून ताठ करा. वरच्या बाजूला खेचा. इथे खांदे कानाला चिकटून असतील. आता श्वास सोडत कंबरेतून पुढे, खाली वाका. गुडघे न वाकवता हाताचे तळवे जमिनीवर ठेवा. डोकं दोन्ही गुडघ्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. हे करताना जास्त ताण देण्याचा प्रयत्न मात्र करू नका. श्वासोच्छ्वास सामान्य ठेवून जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ या स्थितीत थांबा. मग हळूहळू पुन्हा आधीच्या स्थितीत या. दिवसातून दोन-तीन वेळा हे आसन करा.