हिवाळा आला की त्वचा कोरडी होते, त्याचप्रमाणे डोक्यातील त्वचाही कोरडी होते. मग कोंडा होतो आणि केस कोरडे होतात. सध्या प्रदूषण, शाम्पूचा वाढता वापर ही पण केस कोरडे होण्याची कारणे असू शकतात. फास्टफूडचे वाढलेले सेवन हेही केसांचा पोत बिघडण्याचे एक मुख्य कारण आहे. या कोरड्या केसांना सांभाळणे ही एक मोठी जोखीम असते. या समस्येवर उपाय म्हणून लोक सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. मात्र त्याचे केसांवर दुष्परिणाम होण्याचीही शक्यता असते. या सौंदर्यप्रसाधनांपेक्षा घरातील वस्तू वापरल्यास त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो.
मध आणि व्हेजिटेबल ऑईल
यासाठी दोन चमचे मध आणि दोन चमचे व्हेजिटेबल ऑईल गरजेचे आहे. ही पेस्ट केसाला १५ मिनिटे लावून ठेवा आणि त्यानंतर शाम्पूने केस धुवून टाका.
अंड्याचा बलक आणि पाणी
यासाठी तुम्हाला २ अंड्यांचे बलक लागतील. हे बलक वाटीत घेऊन त्यामध्ये ३ चमचे पाणी घाला. हे मिश्रण योग्य पद्धतीने ढवळा. हे मिश्रण ३० मिनिटांसाठी केसांना लावून ठेवा.
घरगुती गरम तेलाचे उपचार
यासाठी तुम्हाला दोन चमचे बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल आणि २ चमचे खोबरेल तेल लागते. ही सगळी तेले एकत्र करुन ती थोडीशी कोमट करा. मग या तेलाने मसाज करा
अंडे, दही आणि मधाचे मिश्रण
२ अंडी, १ चमचा मध आणि २ चमचे दही घ्या. आधी अंडे फेटून घ्या त्यानंतर त्यात मध आणि दही घाला. त्याची चांगली पेस्ट झाल्यावर ती केसांना लावून ठेवा.