मकर संक्रांतीला तिळाचे दान आणि सेवन केले जाते. अशी प्रथा आहे की, माघ महिन्यात जो रोज विष्णूची तिळाने पूजा करतो त्याचे सारे कष्ट दूर होतात. वैज्ञानिक दृष्टिकाेनाने तिळाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
तिळाचे सेवन शरीराचे तापमान गरम ठेवते आणि याच्या तेलाने शरीराला भरपूर मऊपणा येतो. खरं तर हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी होते. अशावेळी आपल्याला बाहेरच्या तापमानात आतील तापमानाला संतुलित करायचे असते. तीळ आणि गूळ गरम असतो. हे खाल्ल्याने शरीर गरम राहाते. म्हणून या सणाच्या वेळी या वस्तू खाल्ल्या आिण बनवल्या जातात.
तिळात कॉपर, मॅग्नेशियम, ट्राइयोफान, आयर्न, मॅग्निज, कॅल्शियम, फास्फरस, झिंक, व्हिटॅमिन बी १ आणि रेशे मोठ्या प्रमाणात असतात. एक चतुर्थांश कप किंवा ३६ ग्रॅम तिळामुळे २०६ कॅलरी ऊर्जा प्राप्त होते. तिळात अँटिऑक्सिडेंटचे गुणदेखील असतात.