मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या आपल्या देशातील प्रमुख मायानगरी. आणि या मायानगरीचं आकर्षण प्रत्येकालाच पडत. असच आकर्षण काजलला सुद्धा पडलं. कोलकाताला नोकरी लावतो , चांगली १०,००० ची नोकरी मिळेल ह्या मोहापायी व घरची परिस्थिती थोडीतरी सुधारेल ह्या विचाराने एका एजंटच्या मदतीने ती कोलकात्याला आली. मीना आणि तिचा प्रियकर लग्न करणार होते पण घरच्यांचा विरोध होता. कारण ही तसच होतं. कोण कुठचा मुलगा ? कुटूंबाचा पत्ता नाही. आई वडील माहित नाही. त्याला आपली पोटची मुलगी कशी देणार? शेवटी दोघे पळून दिल्लीला आले.
बॉलिवुडची जादू संपूर्ण देशावरच पडली आहे. मुंबई म्हणजेच बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्याचे प्रवेशद्वारच. हाच दरवाजा नवोदित कलाकारांना खुणावत असतो. राणी सुद्धा इथे आपलं नाशिब आजमावायला आली होती. तिला ऑडिशन्स साठी एका कास्टिंग कॉर्डिनेटरने बोलावल होता.
तिघींचा प्रवास जरी वेगळा असला तरी शेवट मात्र एकच झाला, त्यांना मुंबई, दिल्ली, कोलकोत्ता च्या red light area म्हणजेच वैश्यावस्तीत विकण्यात आलं. हि तर कहाणी तिघींची. अश्या लाखो काजल, मीना आणि राणी या वैश्यावस्तीत दररोज विकल्या जातात आणि या दलदलीत त्या एवढ्या फसतात कि त्यांना बाहेर निघणं हि मुश्कील होतं.
अश्या हि अनेक महिला आहेत ज्या स्वतः हुन किंवा मजबुरीने हा व्यवसाय स्विकारतात पण या व्यवसायाचे भयाण वास्तव नंतर त्यांच्या सामोरी येते.
ज्या किंमतीला त्यांना विकलं जात ते पैसे मुद्लीसोबत परत केल्यावर त्यांना सोडलं जात. परंतु तोवर २०-३० वर्षे उलटून गेलेली असतात. त्याकाळात बऱ्याच महिलांना संसर्गजन्य आजार झाले असतात. या समाजात संसर्गजन्य आजाराविषयी जागृतता खूपच कमी आहे. आज आपला देश HIV/ AIDS च्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि हि संख्या २,१००,००० एवढी आहे. अश्या अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या या महिलांसाठी व त्यांच्या मुलांसाठी कार्य करते, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करते पण हा sofisticated म्हणवणारा समाज कधीच त्यांना मुख्य प्रवाहात येऊ देत नाही.
Prostitution हा जगातील सर्वात जुना व्यवसाय आहे.आर्थिक मंदीतही हा व्यवसाय ढासळला नाही. कित्येक व्यवसाय आर्थिक मंदीत डबघाईला गेले. परंतु या व्यवसायाला उतरती कळा कधीच आली नाही. आता या परीस्थीतीला जबाबदार कोण????हाच sofisticated म्हणवणारा समाजच ना?
नाही म्हटलं तर त्या सुद्धा आपल्या या समाजाचा भाग आहेत आणि कित्येक मुली त्यांच्यामुळेच सुरक्षित आहेत, कारण वासनेचे भक्षक या जगात जागोजागी, गल्लोगल्ली आहेत आणि त्यांना शमवण्याचे काम हे याच रंगीत महिला करत असतात. पण त्यांची काळी दुनिया आपल्या दृष्टीक्षेपात कधीच पडत नाही.
ही रंगीत महिलांची काळी दुनिया कधीतरी बदलायलाच हवी. त्याच्या व्यवसायात, राहणीमानात, शिक्षणात, आर्थिकतेत अमुलाग्र बदल व्हायलाच हवे. तेव्हाच ती सामान्य महिलांची असामान्य दुनिया मानली जाईल.
– नेहांकी संखे