राज्यातील वन विभागात सुमारे ९०० जागांसाठी मेगा भरती होणार असून वनरक्षक पदासाठी ही भरती असणार आहे. ह्या प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे असणे अनिवार्य आहे. मागासवर्गीय उमेदवाराला ५ वर्षाची अधिक मुभा देण्यात आली आहे. उमेदवार १२ पास असणे गरजेचे आहे. सदर भरतीचे ठिकाण राज्यात सर्वत्र आहे. तर अर्ज भरण्यासाठीची मुदत ३ फेब्रुवारी २०१९ आहे.