पनवेल | आपल्या समस्या ह्या सुटत नाही म्हणून आंदोलनाद्वारे सरकारास जाग यावी म्हणून ह्या शेतकरी मोर्च्याचे आयोजन केले होते.साता-याहुन पायी चालत आलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी मोर्चा पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात काही वेळेसाठी विसावला होता. शेतकरी कामगार पक्ष, पनवेल यांच्या वतीने मोर्चातील शेतक-यांचे पनवेल येथे प्रितम म्हात्रे यांनी त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या व मा. आ.भाई विवेक पाटील, मा. आ. बाळाराम पाटील, मा. जे.एम.म्हात्रे यांच्या आदेशाने त्यांना पाठींबाही देण्यात आला.
गेल्या दहा वर्षापासून न्याय मिळत नसल्याने सातारा जिल्ह्यातील खंङाळा येथून अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकण्यासाठी शेतकऱ्यांनी कूच केली असून नुकतेच त्यांनी पनवेल तालुक्यातील शेडूंग फाटा येथे प्रवेश केला आहे. सोमवारी हा अर्धनग्न मोर्चा मंत्रालयावर धडकणार असल्याचे यावेळी शेतक-यांकडुन सांगण्यात आले. यावेळी शेतक-यानी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत आपला निषेध व्यक्त केला.