मुंबई | जेष्ठ अभिनेत्री मायमाऊली सुलोचनादीदींना
‘दादासाहेब फाळके पुरस्कार’मिळावा ही सर्वांचीच प्रबळ इच्छा!मात्र या इच्छेला राजकीय शक्तीची जोड मिळताना दिसत नाही.मा.शिवसेना प्रमुखांनी तत्कालिन राष्ट्रपती मा प्रतिभाताई पाटील यांच्याकडे कसाबला फाशी नी सुलोचनादीदींना फाळके पुरस्कार मिळावेत हे दोन विषय दिले होते.राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या प्रतिभाताई मा बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीला आल्या तेव्हा नाराज बाळासाहेबांनी प्रतिभाताईंशी बोलणे टाळून पाठ फिरवली. बाळासाहेबांची ही इच्छा अपूर्ण राहिली.महाराष्ट्रात सत्तेत शिवसेना आहे.केंद्रात सत्तेत भागिदार आहेत.
पण ९०पार केलेल्या दीदींना हा पुरस्कार मिळावा म्हणून ,मराठी कलावंताचा सन्मान व्हावा म्हणून पुढाकार घेत असले तरी ते दिसत नाही.राज्यातले फडणवीस सरकार मराठी कलाकारांना दुय्यम स्थान देत आले आहे. आमच्या मायमाऊलीला हा सन्मान असा मागून मिळण्यापेक्षा तो स्वतःहून सरकारने देण्याची गरज होती.सुलोचनादीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणे ही समस्त देशवासियांची मानवंदना ठरेल.यासाठी महाराष्ट्रातील कलावंत,सामाजिक संस्था,जनता ,संघटना व राजकारण्यांनी आपल्यापरीने सहकार्य करायला हवे.हीच मागणी करत दरम्यान काही पत्रकारांनी सुलोचनादीदींची भेट ही घेऊन आपली आकांक्षा बोलुन दाखवली.त्यावर दीदींच्या प्रसन्नचित्त हास्याने आम्हाला बळ मिळाले,असेच पत्रकारांचे म्हणणे होते.