राज्यात ग्रामीण भागात एक लाख नागरिकांना पट्टेवाटप करण्यात येणार आहे. शहरी भागातही पट्टेवाटपाची प्रक्रिया सुरु आहे. पट्टयाची नोंदणी करुन दिल्यामुळे गरीब माणसाला त्याचा हक्क मिळाला. जागेची नोंदणी करण्याबरोबरच कच्च्या घरात राहणाऱ्या गरीब माणसाला पक्के घर देण्याचाही शासनाचा मानस असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पूर्व नागपुरातील नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवरील झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टेवाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.