मानखुर्द | मानखुर्द विभागात नर्सरीपासुन ग्रज्युएट पर्यंत एकमेव असलेल्या ग्लोबल क्लासेसचा पहिलावहिला स्नेहसंमेलन सोहळा शनिवारी दिनांक ५ जानेवारी २०१९ रोजी पार पडला. GLOBAL Festival 2019 असे नामकरण असलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे व त्यांनी केलेल्या आयोजनाचे कौतूक सर्वांनीच केले. सर्व शिक्षक, कर्मचारी आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यी ह्यात आवर्जुन उपस्थित होता.ज्या शिस्तीसाठी ‘ग्लोबल अकॅडमी’ ओळखली जाते,ती शिस्त गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी कार्यक्रमादरम्यान पाहण्यास मिळाली.जवळपास १००० हून अधिक प्रेक्षक हयाठिकाणी जमले होते. ११ आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी करण सरांच्या साथीने योग्य मार्गदर्शनसह ही आयोजन लीलया पेलले. ग्रीनरूम आणि स्टेज मागील कामे ज्युपिटर ग्लोबल स्कूलचा स्टाफ आणि इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट त-हेने हाताळले. तर स्टेजवरील व्यवस्था ग्लोबल अकॅडमीचा स्टाफ आणि विनय सर यांनी पाहिली. प्रत्येक गोष्टीतील विद्यार्थ्यांनी केलेले मायक्रो मैनेजमेंट कामी आले.खास तरूणाईचे आकर्षण म्हणजे सेल्फी पॉईंट,त्याचाही खुबीने वापर केला. पालकांना ग्रीनरूम मध्ये प्रवेश न दिल्यामुळे गोंधळ टाळणे, त्वरीत संपर्कासाठी वॉकी-टॉकीचा केलेला वापर या गोष्टींमुळे २४ विविध परफॉर्मन्सेसचा भरगच्च कार्यक्रम अगदी वेळेत पुर्ण करण्यात यश आले.ग्लोबल परिवारातील कित्येकांना आपले कलागुण सादर करण्याची संधी या कार्यक्रमातून प्राप्त झाली. सातारा येथुन आलेले अनुभवी सुत्रसंचालक श्री सुजित काळंगे यांच्या समवेत कु. निमा यादव (११वी) आणि कु. ममता पंडित (१२वी)यांनी केलेले अस्खलित आणि दमदार सुत्रसंचालन प्रभावित करणारे ठरले. क्लासेसच्या सहशिक्षिका कु.निकीता मतकर मॅडम यांनाही लावणी सादर करण्याची संधी मिळाली. इतकंच काय तर शेवटच्या डान्समध्ये स्वतः क्लासेसचे सर्वेसर्वा घाडगे सरांनी दिलेला परफॉर्मन्स ग्लोबल परिवारातील एकजुटता दाखवतो.ग्लोबल परिवारातील सर्वच शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करताना ४ विभागातून प्रत्येकी एक असे ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’आकर्षक ट्रॉफी सहीत प्रदान करण्यात आले. गेल्या वर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पालकांच्या समवेत केल्याने वातावरणात वेगळीच स्फुर्ती निर्माण झाली होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेची पोचपावती म्हणजे आपल्या ३ विविध कलासादरीकरणास नेरूळ (नवी मुंबई) येथे चालू असलेल्या ‘आगरी-कोळी महोत्सव २०१९’मध्ये निमंत्रित करण्यात आले. थोडक्यात काय तर चिमुकल्यांचे गोंडस नृत्य, मंत्रमुग्ध करणारे गायन, शिट्ट्यांचा अन् टाळ्यांचा कडकडाट, वातावरण भारावून टाकणारे सुत्रसंचालन आणि उत्कृष्ट नियोजन यांमुळे ‘ग्लोबल फेस्टिवल-२०१९’ सुपरहीट ठरला.