मुंबई मॅरेथॉनचे वातावरण व त्याच्या उत्सवाचे स्वरूप पाहूनच आपणास आपोआप फिटनेस येतो, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे माध्यमाशी बोलताना काढले. त्यांच्या हस्ते मुंबई मॅरेथॉनच्या ‘ड्रीम रन’ ला ‘फ्लॅग ऑफ’ ने सुरुवात झाली.
यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी अमृता फडणवीस, क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार आशिष शेलार, आमदार राज पुरोहित, मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आदी उपस्थित होते.