कै. अप्पासाहेब साठे यांचे व्यक्तिमत्व चतुरस्त्र असे होते. ‘आठवणींचे अमृत’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या जीवनातील वस्तुनिष्ठ अनुभव कथन करणारे आहे. हे पुस्तक प्रत्येकाच्या जीवनात प्रेरणा देणारे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण येथे काढले.
नवकोकण एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचलित डीबीजे महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कै. अप्पासाहेब साठे यांच्या आठवणींचे अमृत (द्वितीय आवृत्ती) या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.