ग्रामीण भागातील बचतगटांच्या तसेच ग्रामीण कारागिरांच्या उत्पादनांच्या ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे येत्या बुधवारपासून (23 जानेवारी) ते 4 फेब्रुवारीपर्यंत मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रदर्शनात राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागातील बचतगट सहभागी झाले असून 511 स्टॉलच्या माध्यमातून ते उत्पादनांची विक्री करणार आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांचे 70 स्टॉल असून त्यातून मुंबईकरांना वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घेता येणार आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. वांद्रे कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदान क्रमांक १, ४, ५ व ६ येथे हे प्रदर्शन होणार आहे.