एखाद्या देखण्या मुलाकडे मुली आकर्षित झाल्या तरी त्याचा प्रियकर म्हणून स्विकार करतीलच असं नाही. मुलाची ‘मॅच्युरिटी’ हा सगळ्यात पहिला क्राईटेरिया मुलींसाठी महत्वाचा असतो. त्यांना समजून घेणारा, काळजी करणारा, प्रॉब्लेम्स मधून सहज बाहेर काढणारा, अडचणींच्या काळात हायपर न होता शांतपणे मार्ग शोधणारा, पूर्णपणे जबाबदारी घेणाऱ्या मुलाला जास्त प्रायोरोटी मिळते.
मुलींसाठी दिसणे इतके मॅटर करत नाही जितकी मॅच्युरिटी. प्रेमाच्या बाबतीत मुली रोमँटिक असल्या तरी आयुष्याच्या बाबतीत प्रचंड प्रँक्टीकल असतात. भविष्याची सुरक्षितता त्यांच्यासाठी जास्त महत्वाची असते.
बहुतांश मूली पैसा बघत नसल्या तरी नात्यात अनेक प्रोब्लेम्स हे पैशाच्या कमतरतेमुळेच निर्माण होतात. त्यामुळे पैसा हा महत्वाचा असतोच. प्रेमाला पैसा लागत नाही असं कितीही म्हटलं तरी पैशाशिवाय प्रेम तितकं खुलत देखील नाही.
सुरुवातीच्या काळात अनेक गोष्टी बोलून मुलीला आपल्याकडे आकर्षित करण्यात मुलांना यश आलं तरी त्यात सातत्य राखता येत नाही. प्रेमामध्ये मुलांच्या बुद्धिला गुंगी चढलेली असते त्यामुळे त्यांना वास्तवाचं भान राहत नाही. कसंही वागलो तरी ति आपली साथ सोडणार नाही हे गृहित धरणं महागात पडतं.
मुलांसाठी अडचणीच्या काळात तिची साथ महत्वाची असते तर मुलींसाठी अडचणीतून बाहेर काढणारा तो. हे समजण्यात गल्लत झाली की नात्याला उतरती कळा लागते…
– अभिनव ब. बसवर