महाराष्ट्रातील तृप्तराज पंड्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2019 विजेता ठरला
• मुंबई येथील मुंलुंड भागातील तृप्तराज पंड्या या 12 वर्षाच्या बालकाने तबला वादनात लौकिक मिळवला आहे.
• गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डने तृप्तराज च्या तबलावादनाची नोंद घेत जगातील सर्वात कमी वयाचा तबला तज्ज्ञ म्हणून गौरविले आहे.
• तृत्पराजने वयाच्या दुसऱ्या वर्षीच तबला वादनाचा जाहीर कार्यक्रम सादर केला असून आकाशवाणी व दूरचित्रवाहिण्यांवरही त्याने प्रस्तुती दिली आहे व 200 लाईव्ह कार्यक्रम केले आहेत.