नेरुळ | पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरुळ येथील विद्याभवन माध्यमिक इंग्रजी विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन सोहळा दि. १७ जानेवारी २०१९ रोजी पार पडला.या प्रसंगी प्रमुख अतिथी माजी मंत्री गणेशजी नाईक यांचा सत्कार संस्थेचे संचालक आदरणीय डॉ. शं. पां. किंजवडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. माजी मंत्री श्री. गणेशजी नाईक यांच्या हस्ते एस. एस. सी परीक्षेतील व शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच विविध क्षेत्रात आणि स्पर्धेतील विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील गौरव करण्यात आला.आपल्या भाषणात त्यांनी डॉ. शं. पां. किंजवडेकर हे पुणे विद्यार्थी गृहाला लाभलेले रत्न अशी स्तुती त्यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर इतर माहितीही दिले.
तसेच नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचे त्यांनी कौतुक केले व पुढे असेच यश संपादन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांचे यश हे संस्थाचालक या गुरुजन यांच्या मार्गदर्शनावर अवलंबून असते व या शाळेचे विद्यार्थी आंतरशालेय स्तरावर देखील उत्तम कामगिरी करता आहेत यात शिक्षकांचे मोठे योगदान आहे, असे सांगत त्यांनी शिक्षकांचेही त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमास पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक डॉ. शं. पां. किंजवडेकर, प्राचार्य कृ. ना. शिरकांडे, प्रा. हणमंत भोसले, श्री. दिनेश मिसाळ, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री. गणेशजी भगत, नगरसेवक श्री. सूरज पाटील तसेच मुख्याध्यापिका श्रीम. साधना कुलश्रेष्ठ, श्रीम. सुवर्णा मिसाळ, श्रीम. मनिषा मुळीक, मुख्याध्यापक श्री. आत्माराम माने, समन्वयक श्रीम. विजया गणेश, निवृत्त शिक्षिका श्रीम. निर्मला भांडारकर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. श्रीजा नायर यांनी केले.