नवी मुंबई | सुरक्षा रक्षक मंडळातर्फे जी आस्थापने काही कारणास्तव बंद झाली वा करावी लागली,अशा आस्थापनांतील मुख्य मालकांवर दोषांचा ठपका ठेवत मंडळाने खटले दाखल केले आहेत.त्यामुळे अशा आस्थापनांमधील सुरक्षा मंडळाचा कर्मचारी वर्ग हा काही काळापासून नोकरी पासून वंचित आहे.मंडळाकडील नोंदीत ह्या सुरक्षा रक्षकांना प्रतिक्षायादीवर ठेवण्यात येत आहे.नवीन आस्थापनांमधील मागणीनुसार सुरक्षा रक्षकांना निवडीसाठी पाठविण्यात येते.
सुरक्षारक्षक मंडळाच्या एकुण ४८७० सुरक्षा रक्षक प्रतिक्षायादीवर आहेत.प्रतिक्षायादीवरील सुरक्षा रक्षकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने सुरक्षा रक्षक मंडळाने नोंदणीक्रंमाक १ ते ४५००० कर्मचा-यांना दिनांक १ फेब्रुवारी पासुन सोमवार व बुधवारी ड्युटीसाठी मंडळात उपस्थित राहण्याचे नोटीस बजावले आहे.नोंदणी क्रमांक ४५००१ ते ५७००० नोंदणी क्रमांकाकरता मंगळवारी,५७००१ ते ६०५०० नोंदणी क्रमांकाकरता गुरुवारी,६०५०१ ते ६०८०० नोंदणी क्रमांकाकरता शुक्रवारी,व ६०८०१ ते ६११०० नोंदणी क्रमांकाकरता महिन्याच्या पहिल्या,तिस-या व पाचव्या शनिवारी बोलावले आहे.
ह्या प्रतिक्षायादीवर असणा-या कर्मचा-यांमध्ये कमालीची नाराजी आहे.ड्युटी न लागल्याने कर्मचा-यां मध्ये कमालीची अस्वस्थता आहे.ड्युटी न लागत नसल्याने भत्ता मिळणेही कठीण झाले आहे.वरिष्ठ अधिकारी वर्गाचे ना लेखी आश्वासन आणि ना आश्वस्त सल्ला यांमुळे सुरक्षा रक्षक मंडळाचा प्रतिक्षा यादीवरील कर्मचारी वर्ग कमालीचा संतापलेला आहे.वयाची चाळीशी गाठलेला जुना कर्मचारी वर्ग जो १ ते ४५००० ह्या नोंदणी क्रमांकात येतो,त्यांनाही ४० वय झाल्याने वाढत्या वयोमानानुसार ड्युटी मिळत नसल्याची कर्मचारीवृंदात कमालीची नाराजी पसरल्याचे वृत्त आहे.जुन्या सुरक्षा रक्षकांची अशीही मागणी आहे,की निदान जुन्या कर्मचारी वर्गासाठी दर दिवशी येण्यास मुभा द्यावी.