सानपाडा | सुरक्षा रक्षक मंडळाचे कर्मचारी जिथे कार्यरत होते अशी आस्थापने काही तांत्रिक बाबींमुळे बंद झाली आहेत.या आस्थापनांतील मुख्य मालकांवर दोषांचा ठपका ठेवत मंडळाने खटले दाखल केले आहेत.त्यामुळे अशा आस्थापनांमधील सुरक्षा मंडळाचा कर्मचारी वर्ग हा काही काळापासून नोकरी पासून वंचित आहे.मंडळाकडील नोंदीत ह्या सुरक्षा रक्षकांना प्रतिक्षायादीवर ठेवण्यात आले आहे.त्यामळे भविष्याच्या चिंतेत हे कामगार असून सुरक्षित नोकरीची चिंता या सुरक्षा कामगारांना भेडसावू लागली आहे.
नवीन आस्थापनांमधील मागणीनुसार सुरक्षा रक्षकांना निवडीसाठी पाठविण्यात येते.
सुरक्षारक्षक मंडळाच्या एकुण ४८७० सुरक्षा रक्षक प्रतिक्षायादीवर आहेत.प्रतिक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने सुरक्षा रक्षक मंडळाने नोंदणीक्रंमाक १ ते ४५ हजार कर्मचाऱ्यांना दिनांक १ फेब्रुवारी २०१९ पासुन सोमवार व बुधवारी ड्युटी मिळण्यासठी मंडळात उपस्थित राहण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.नोंदणी क्रमांक ४५ हजार १ ते ५७ हजार या नोंदणी क्रमांकांकरीता दर मंगळवारी,५७ हजार १ ते ६० हजार ५०० या नोंदणी क्रमांकांकरीता गुरुवारी,६० हजार ५०१ ते ६० हजार ८०० या नोंदणी क्रमांकांकरीता शुक्रवारी,व ६० हजार ८०१ ते ६१ हजार १०० नोंदणी क्रमांकांकरीता महिन्याच्या पहिल्या,तिसऱ्या व पाचव्या शनिवारी बोलावले आहे.
या प्रतिक्षायादीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे.ड्युटी न लागल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.ड्युटी लागत नसल्याने भत्ता मिळणेही कठीण झाले आहे.वरिष्ठ अधिकारी वर्गाचे लेखी आश्वासन नसल्याने सुरक्षा रक्षक मंडळाचा प्रतिक्षा यादीवरील कर्मचारी वर्ग कमालीचा संतापलेला आहे.वयाची चाळीशी गाठलेला जुना कर्मचारी वर्ग हा १ ते ४५००० या नोंदणी क्रमांकात येतो. मात्र त्यांनाही ४० वय झाल्याने वाढत्या वयोमानानुसार ड्युटी मिळत नसल्याने नाराजी पसरली आहे.जुन्या सुरक्षा रक्षकांची मागणी केली आहे,की निदान जुन्या कर्मचारी वर्गासाठी दर दिवशी येण्यास मुभा द्यावी. त्यामुळे सुरक्षा कामगाराच सुरक्षित नोकरीच्या विवंचनेत असल्याचे चित्र आहे.