एका योजनेमधून राज्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सरकारी रुग्णालयांना नवजात बालकांसाठी ‘बेबी-केयर किट’चे वाटप करण्यास महाराष्ट्र राज्य सरकारने सुरुवात केली आहे. या योजनेसाठी 20 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. बालमृत्यू दर कमी करण्यासाठी ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ केवळ पहिल्या बाळासाठीच घेतला जाऊ शकणार.
सरकारी रूग्णालयात दाखल झालेल्या स्त्रिच्या पहिल्या प्रसूतीनंतर त्यांना ही किट दिली जाईल. प्रत्येक किटमध्ये एक चादर, एक लहान गादी, टॉवेल, थर्मामीटर, बेबी ऑइल, शॅम्पू, खेळणी, नख कापण्याचे कटर, हातमोजे, मोजे आणि अन्य काही वस्तूंचा समावेश आहे. या किटची किंमत सुमारे 2,000 रुपये इतकी आहे. राज्यात सरकारी रुग्णालये आणि PHC मध्ये दरवर्षी सुमारे 10 लक्ष प्रसूती होतात, त्यापैकी चार लक्ष प्रथमच आई बनतात. अश्या प्रकारची योजना आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यांमध्येही सुरू आहे.