तो मला गृहित धरतो,त्याच्या मर्जीप्रमाणे वागतो,वाट्टेल तसा बोलतो, त्याला माझ्या मित्रांशी देखील प्रॉब्लेम, याच्याशी बोलू नको, तो का तूला मेसेज करतो, फोटोमध्ये मित्राला एवढं चिकटुन थांबण्याची गरज होती का, त्याला व्हाट्सएप वर ब्लॉक करुन टाक, कपड़े असलेच का घातले, माझा फोन का नाही उचलला, तू एकटीच या जगात बिजी मी मात्र रिकामटेकडा, हुशSssss
रिलेशनशीप मध्ये या फेज मध्ये बहुतांश लोक अडकतात. असं का घड़त असेल याचा कोणी विचार करत नाही. इतक्या सुंदर नात्यामध्ये एवढे प्रोब्लेम्स का निर्माण झाले असतील ?, मने का दुखावली असतील ?, एकमेकांना भेटण्यासाठी वाट्टेल ति धडपड करणारे आज फ़ोनवर साधं पंधरा मिनिटे देखील नीट का बोलू शकत नसतील ?
तुम्ही एकटे नाही आहात जे या प्रोब्लेम्सना फेस करताय. हे फक्त तुमच्याच बाबतीत घड़तंय आणि बाकी सगळ्या जोड्या अगदीच जन्नत मध्ये आहेत असं नाहिये. या नात्यातून बाहेर पडताच तुमचं आयुष्य लगेच कायमस्वरूपी सुंदर होणार, तुम्हाला कधीच कोणते प्रोब्लेम्स, ताण जाणवनार नाहीत असंही नाहिये. समोरचा माणूस इतकाच नालायक असता तर आपल्याला त्याच्याशी प्रेम तरी झालं असतं का ?
याचा अर्थ कुठेतरी काहितरी गड़बड़ आहे. आपल्याला त्यावर सोल्यूशन काढणं गरजेचं आहे. अगोदर सोल्यूशन काढण्याची मानसिकता तरी तयार करा. मग मी पुढे सोल्यूशन नक्की सांगेन, कारण माझा ब्रेकअप वर नाही तर नाती निभावण्यावर विश्वास आहे. ब्रेकअप कोणीपण करतं, त्याला काही हिंमत नाही लागत. मैदान सोडून पळून जाण्यात कसला आलाय मोठा पराक्रम. एकदा धरलेला हात पूढे घेऊन जाता आलं तर मानलं…
– अभिनव बसवर