वाशी-नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट,महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,व फिल्म आणि थिएटर फेडरेशन नवीमुंबई यांच्या संयुक्त सहकार्याने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात जेष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार मिळावा म्हणुन स्वाक्षरी मोहिम आखण्यात आलीये.ह्या मोहिमेत विविध मान्यवर,कलाकार- तंत्रज्ञ,व रसिकवर्ग उस्फूर्त प्रतिसाद नोंदवत आहेत.आज दिनांक ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ८ ह्या वेळेत आखण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत अवघ्या दीड तासात आतापर्यंत २०० मान्यवरांनी प्रत्यक्ष येऊन सहभाग दर्शविला आहे.
ADVERTISEMENT