ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हेच्या पाहणीतील निष्कर्ष राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे (GATS-2) 2016-17 नुसार देशभरात महाराष्ट्रामध्ये धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणानुसार धूम्रपान करण्याचे प्रमाण 3.8 इतके असून ते अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.
महाराष्ट्रात धूम्रपान 2.1 टक्क्याने आणि धूम्रविरहित तंबाखू सेवनात 3.1 टक्क्याने घट झाल्याचे आढळून आले आहे. ‘तंबाखूमुक्त शाळा’अभियानांतर्गत 2 हजार 755 शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.