इतिहासात प्रथमच मनुष्याचा आनुवंशिकतावाहक घटक म्हणजे जीन (gene) याच्या अंतर्गत संरचनेत बदल करण्यासाठी ‘जीन एडिटींग’ तंत्राचा प्रयोग करण्यात आला आहे. ब्रायन मेडक्स या नावाच्या व्यक्तीवर हा प्रयोग केला गेला आहे. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की त्यांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. एखाद्या आनुवंशिक रोगाला जन्म होण्याच्या आधीच रोखण्यासाठी मनुष्याच्या DNAमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आता याचे परिणामाविषयी अभ्यास केला जाईल.
संयुक्त राज्ये अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना येथील डॉ. जोसेफ मुएनझर यांच्या नेतृत्वात शास्त्रज्ञांच्या एका चमूने हा मानवी प्रयोग पूर्ण केला आहे. यापूर्वी चीनी शास्त्रज्ञांनी देखील असाच एक प्रयोग केल्याचा दावा केला आहे.