मुंबई | आभा परिवर्तनवादी संस्था मागील ४ वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. संस्थेच्या जागर संविधानाच्या या उपक्रमात ४००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे तर खारीचा वाटा या उपक्रमाच्या माध्यमातून ३७० विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप संस्थेने केले आहे. फक्त वस्तूं देऊन बदल होत नाही हे जाऊन या उपक्रमांतर्गत विविध विषयांवर मार्गदर्शन सत्र आभाने सुरु केले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाक्रमासोबत इतर विषयांची ओळख व्हावी. स्पर्धेच्या युगात माहिती अभावी त्यांना नैराश्य येऊ नये यासाठी विविध विषयांची त्यांना ओळख करून स्पर्धेसाठी सोबतच भविष्यातील शैक्षणिक आणि करिअरच्या आव्हानांसाठी सक्षम करण्याचा संघटनेचा मानस आहे. याची सुरवात सुभेदार रामजी विद्यालय, दहिसर येथून झाली.
या शाळेत पैशाचा उगम, महत्व आणि व्यवस्थापन या विषयावर राजेश मोरे यांनी मागदर्शन केले. त्यानंतर रायगडमधील पोलादपूर तालुक्यातील उमरठ प्रशालेत त्याचें याच विषयांवर मार्गदर्शन झाले. तर करियर मार्गदर्शन या विषयावर नितीन केसरकर यांनी माध्यमिक विद्यालय, साखर यथे तर अक्षदा महाडिक यांनी कांगोरीगड विद्यालय मोरसडे या शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करून त्यांना मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचा आभाचा हा प्रयत्न नेहमीच चालू राहील असे आभाचे राजेश मोरे यांनी सांगितले.