दिनांक 12 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणा राज्यातल्या कुरुक्षेत्र शहरात ‘स्वच्छ शक्ती 2019’ या महिला सरपंचांच्या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. स्वच्छ शक्ती या राष्ट्रीय कार्यक्रमात, स्वच्छ भारत अभियानात ग्रामीण महिलांनी बजावलेली नेतृत्वपूर्ण भूमिका यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. देशभरातल्या महिला सरपंच आणि पंच या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. भारत सरकारच्या पेय जल आणि स्वच्छता मंत्रालयाने हरियाणा सरकारच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले.
स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत ग्रामीण भागात अवलंबिलेल्या उत्तम प्रथा यावेळी प्रदर्शनास मांडण्यात आल्या. याप्रसंगी स्वच्छ शक्ती पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. शिवाय स्वच्छ सुंदर शौचालय प्रदर्शनीही भरविण्यात आली. तसेच हरियाणातल्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन देखील करण्यात आले.