जम्मू व काश्मीर राज्य सरकारने लद्दाख प्रदेशाला ‘विभागीय’ दर्जा प्रदान केल्याची घोषणा केली गेली आहे. लद्दाख प्रदेशाला ‘विभागीय’ दर्जा प्राप्त झाल्यामुळे तेथे आता स्वतंत्र प्रशासकीय व महसूल विभाग तयार करण्यात येणार. जम्मू विभाग आणि काश्मीर विभागानंतर हा राज्यातला तिसरा विभाग आहे. हा जम्मू व काश्मीर राज्यातला सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या प्रदेशांपैकी एक आहे आणि हे राज्यातले सर्वात उंच पठार आहे. प्रदेशाचा बहुतेक भाग समुद्रसपाटीपासून सुमारे 9800 फूट उंचीवर आहे. हा भौगोलिकदृष्ट्या एक अलिप्त भाग आहे आणि वर्षातले जवळपास सहा महिने हा भाग संपर्कात नसतो.
‘जम्मू व काश्मीर लद्दाख स्वायत्त पर्वत विकास परिषद अधिनियम-1997’ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. या कायद्यानुसार, लेह आणि कारगिल जिल्ह्यांकरिता पर्वत विकास परिषदा देखील स्थापन करण्यात आल्या आहेत.