मुंबई | लोहगढ ह्या शौर्यग्रंथाचे प्रकाशन सोहळा मंगळवारी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडला. जगातील सर्वात मोठ्या किल्ल्याची माहिती देणारं हे ऐतिहासिक ग्रंथ, आता मराठी भाषेत उपलब्ध आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. राजू सिंग नाईक, गुरुविंदर सिंग, गगनदीप सिंग, इतिहासकार प्रा. हरी नरके, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे व्यासपीठावर उपस्थित होते.
ग्रंथाचे मूळ लेखन हरजिंदर सिंग दिलगीर यांन केले आहे, तर मराठी ग्रंथ जयराम सिताराम पवार यांनी अनुवादित केले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुस्तकाचे कौतुक केले व लोहगढाचं इतिहासही सांगितले. शीख गुरु, बाबा बंदासिंग बहादुर, लखीराय बंजारा, भाई मनिसिंग बिजरावत यांनी मानवतेसाठी दिलेल्या बलिदानाचे वास्तविक इतिहास ह्या ग्रंथात नमूद केले आहे. या प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन आयुक्त डाॅ श्रीराम पवार यांनी केले.