दिनांक 11 फेब्रुवारी 2019 रोजी सागरी प्रदूषणाशी लढा देण्यासाठी भारताने नॉर्वे सरकारसोबत ‘भारत-नॉर्वे सागरी प्रदूषण पुढाकार’ (India-Norway Marine Pollution Initiative) याची स्थापना करण्यासंदर्भात एका करारावर स्वाक्षरी केली आहे. नॉर्वेचे परराष्ट्र कल्याण मंत्रालय आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने या करारावर स्वाक्षरी केली आहे. ‘भारत-नॉर्वे महासागर संवाद’ याची स्थापना करण्यासाठी जानेवारी 2019 मध्ये भारताचा नॉर्वेसोबत एक करार झाला होता. त्याला साथ म्हणून हा पुढाकार घेतला जात आहे. सागरामधील वाढते प्रदूषण ही चिंतेची बाब आहे आणि याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने एकत्र कार्य करण्याच्या उद्देशाने हा करार केला गेला आहे.
पहिल्यांदाच अश्या भागीदारीमधून दोन्ही देश आपले ज्ञान, अनुभव आणि क्षमता सामायिक करतील. स्वच्छ आणि निरोगी महासागर बनविण्यासाठी, सागरी संसाधनांचा सतत वापर व्हावा आणि निळ्या अर्थव्यवस्थेत वाढ करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सहयोग करतील.
नॉर्वे हा उत्तर-पश्चिम युरोपच्या द्वीपकल्पामधील एक देश आहे. या देशाची राजधानी ओस्लो शहर असून नॉर्वेजियन क्रोन हे देशाचे चलन आहे.