केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2018’ स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातल्या सातारा जिल्हयाने देशात प्रथमक्रमांक पटकाविला आहे. तर उत्तरप्रदेश राज्याला सर्वाधिक नागरिकांच्या सहभागासाठी पुरस्कृत केले गेले. प्रथम तीन राज्ये (अनुक्रमे) – हरियाणा, गुजरात आणि महाराषट्र प्रथम तीन जिल्हे (अनुक्रमे) – सातारा (महाराष्ट्र), रेवाडी (हरियाणा) आणि पेदापल्ली (तेलंगणा) राज्यानुसार सर्वाधिक नागरिकांचा सहभाग(अनुक्रमे) – उत्तरप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र जिल्ह्यानुसार सर्वाधिक नागरिकांचा सहभाग(अनुक्रमे) – नाशिक (महाराष्ट्र), सोलापूर (महाराष्ट्र) आणि चित्तोडगड (राजस्थान)
केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने आयोजित ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदे’च्या समारोपीय कार्यक्रमात ‘स्वच्छ सर्वेक्षण – ग्रामीण 2018’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात देशभरातल्या सर्व 718 जिल्हयांमध्ये स्वच्छतेच्या विविध निकषांवर सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यांतील निवडक गावे याप्रमाणे 6,980 गावांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.