भारतीय नौदलासाठी 111 नेव्हल यूटिलिटी हेलीकॉप्टर (NUH) खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने दिनांक 12 फेब्रुवारी 2019 रोजी इच्छापत्र (Expression of Interest) जाहीर केले आहे. ऑर्डर पूर्ण करण्यासाठी भारताचे संभाव्य धोरणात्मक भागीदार आणि परदेशी संरक्षण कंपन्यांची निवड करण्याच्या उद्देशाने हे इच्छापत्र तयार करण्यात आले आहे. खरेदी केले जाणारे नेव्हल यूटिलिटी हेलीकॉप्टर (NUH) सध्या सेवेत असलेल्या ‘चेतक हेलीकॉप्टर’ची जागा घेणार.
संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून (DAC) याविषयी परवानगी प्राप्त झाली आहे. तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करून भारतीय धोरणात्मक भागीदारांकडून 111 पैकी 95 हेलिकॉप्टर भारतातच तयार केले जातील.