अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जम्मू कश्मीर येथील पुलावामा जिल्ह्यात भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करते, तसेच या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. अभाविप या दुःखाच्या परिस्थितित शहीद जवानांच्या कुटुंबांसोबत खंबीरपणे उभी आहे.
अभाविपची मागणी आहे कि या हल्ल्यात शहिदांचा बलिदान व्यर्थ न जाता, जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटन जैश -ए- मोहम्मद विरोधात त्वरित कारवाई केली पहिजे.
अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पित करताना सांगितले की ‘दहशतवाद हा देशासाठी एक मोठे आव्हान असून संपूर्ण राष्ट्रकरिता हे खूपच दुःखदायक आहे. सरकारने या विषयात त्वरित कारवाई केली पाहिजे, ज्यामुळे शहीदांना न्याय मिळू शकेल. तसेच काही राजकीय पक्ष या विषयावर वोट बैंकचा खेळ खेळत आहेत. अश्या लोकांचा अभाविप निषेध करते आणि त्यांना आवाहन करते की, हा एक गंभीर विषय असून याचे राजकारण करू नये.
अभाविपचे कोंकण प्रांत मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पित केले. ‘शहीदांना लवकरच न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. तसेच अभाविप कोंकण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा जाहीर निषेध करते. जितेंद्र आव्हाड यांनी आज एका वृत्तवाहिनीवर , पुलवामा हल्ला हा मुस्लीमविरोधी राजकारणाचा परिपाक असे सांगितले. जितेंद्र आव्हाडने केलेल्या विधानाचा अभाविप विरोध करते. तसेच यातून सामाजिक द्वेष निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.