मुंबई | सोनी टिव्हीवरील सुप्रसिद्ध विनोदी शो ‘द कपिल शर्मा शो’ मधून नवज्योत सिंह सिद्धूची हकालपट्टी करण्यात आली आहे. “मूठभर लोकांसाठी तुम्ही पाकिस्तानला दोष का देता? मी झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. मात्र, पाकिस्तानशी चर्चा करूनच हा प्रश्न सोडवला पाहिजे” अशी वादग्रस्त टिपणी सिद्धू यांनी ट्विटरवर केली होती. या ट्विटनंतर नेटक-यांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली आहे. आणि कपील शर्मा शो मधून नवज्योत सिंह सिद्धूची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, द कपिल शर्मा शोचे दोन एपिसोडचे शूट पूर्ण झाले असून यात सिद्धू दिसणार नाही. त्यामुळे सिद्धूची कायमस्वरूपी हकालपट्टी होणार की तात्पूरती हे लवकर प्रेक्षकांना चॅनलच्या माध्यमातून कळेल.