मुंबई | संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. रामगिरी येथे आयोजित कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती श्रीमती शीतल तेली-ऊगले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, प्रभारी जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, विशेष कार्य अधिकारी श्रीमती आशा पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, सहायक अभियंता अजय पाटील आदी यावेळी उपस्थित होते.