इंटरनेट एक असं साधन आहे ज्यामुळे जगभरातील लोकं जोडले गेले. सात समुद्रापार संवाद साधनं सहज शक्य झाले. १९५० च्या दशकात इलेक्ट्रॉनिक संगणकाच्या प्रारंभापासून इंटरनेटच्या संशोधनाची सुरुवात झाली. १९६० च्या दशकाच्या अखेरीस इंटरनेटचे पहिले प्रोटोटाइप एआरपेनेट (अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क) तयार करण्यात आले. विदेश संचार निगम लिमिटेड (व्हीएसएनएल) ने १५ ऑगस्ट १९९५ रोजी,भारतात सार्वजनिक इंटरनेटचा वापर सुरू केले.
पूर्वी इंटरनेटचं वापर फक्त महत्त्वाच्या कामासाठी होत असे. श्रीमंतांकडे असणारे संगणक आणि इंटरनेट सुविधा आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडू शकतो. भारतात ४६० दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत ज्यांची संख्या २०२१ पर्यंत ६३५.८ दशलक्ष होण्याची शक्यता आहे. जगातल्या सर्वात मोठा ऑनलाईन बाजार मध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. इंटरनेट झपाट्याने वाढत असल्यामुळे जागतिक कंपन्यांचे भारतावर लक्ष आहे. मायक्रोसोफ्ट, गुगल, याहू यासारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी भारतात बसता मांडला आहे.
इंटरनेटचे फायदे जेवढे आहेत तेवढेच तोटे देखील आहेत. इंटरनेटचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी जेवढे केले जातात, तेवढेच व्यवहारासाठी होतो. भारतात व्यापारासाठी इंटरनेटचा उपयोग जास्त प्रमाणावर आहे. किंबहुना दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ ज्ञानासाठी नाही तर अनेक कारणांसाठी इंटरनेटचा उपयोग होतो. ईमेल, व्हिडिओ कॉल, ऑनलाईन गेम्स, सोशल मीडिया असे बरेच सुविधा इंटरनेट द्वारा उपलब्ध आहे. काही वर्षात सर्व काम ऑनलाईन होईल असं बोललं तर वावगं वाटणार नाही.
जगाशी संवाद साधायला वापरलेलं इंटरनेट घरातलेच संवाद थांबवू लागलाय. हळू हळू मुलांना इंटरनेटच व्यसन लागलं. इंटरनेटच व्यसन म्हंटल तर कोणाला विश्वास बसणार नाही. पण हे तितकच खरं आहे. पुण्यात मुक्तांगण मध्ये इंटरनेटच्या व्यसनातून मुक्तता मिळवण्यासाठी केंद्र सुरु झाले आहे. ह्या व्यसनात तुमची मुलं एवढी बुडालेली असतात की ती रागीट होतात, छोट्या गोष्टंसाठी चिडतात, तर कधी कधी स्वतःच नुकसान करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना इंटरनेटचे दुरुपयोग समजून द्याला हवं. त्यांना ऑनलाईन गेम्स जास्त खेळायला देऊ नका. इंटरनेट पेक्षा त्यांना त्यांचे आवडते छंद करायला द्या.
इंटरनेट वर फसवणूक करणाऱ्या काही कंपन्या आहेत त्या तुमची माहिती घेवून तुम्हाला लुबाडू शकतात. त्यामुळे कोणत्याही वेबसाईटवर तुमची माहिती टाकण्यापूर्वी ती वेबसाईट योग्य असण्याची खात्री करून घ्या. इंटरनेट वापरताना काय करू नये व काय करावे हे समजून घ्या.
इंटरनेटचा वापर अभ्यासाठी करा, त्यावर तुम्हाला भरपूर माहिती उपलब्ध होईल. अनोळखी व्यक्तीशी बोलताना सतर्क राहावे व तुमची माहिती देणं टाळा. इंटरनेट वरून काही डाऊनलोड करण्यापूर्वी साईट तपासून घ्या. तुमच्या कॉम्प्युटर मध्ये व्हायरस स्कॅनर बसवून घ्या. तुमचे पासवर्ड कोणालाही देऊ नका.
इंटरनेटवरून कॉपी करून कॉपीराइट केलेल्या संगणक प्रोग्रामची चोरी करू नका. लेखक आणि प्रकाशकाच्या परवानगीशिवाय पुस्तकांच्या, मासिकांच्या कोणत्याही कॉपीराईट सामग्रीची डुप्लिकेट तयार करू नका. इंटरनेटच्या जाळ्यात अडकु नका व इंटरनेटचे व्यसन लागू देऊ नका.
– मनाली मोरे